महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूरकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन; जळत्या बसमध्ये चढून वाचवले १८ जणांचे प्राण

पहाटेची वेळ..तेलंगणा परिवहनच्या बसमधील १८ प्रवाशी गाढ झोपलेले....अचानक बसने रस्त्याच्याकडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. समोरचा ट्रक बॅटरी वाहतूक करणारा असल्याने त्यातील असंख्य बॅटऱ्यांचा स्फोट झाला अन् प्रवासी वाहतूक करणाऱ्या तेलंगणाच्या बसला आग लागली.

सोलापूरकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

By

Published : Jun 7, 2019, 11:26 AM IST

Updated : Jun 7, 2019, 12:47 PM IST

सोलापूर- एका जीवघेण्या प्रसंगात सोलापूरच्या ६ युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. तेलंगणा राज्य परिवहनच्या बसचा अपघात झाल्यानंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून १८ अपघातग्रस्तांचे प्राण या युवकांनी वाचवले आहेत. जळत्या बसमध्ये चढून प्राण वाचवणाऱ्या या युवकांचे सर्व नागरिकांडून कौतुक होत आहे.

अमीर मुलाणी, आकाश सरवदे, तुषार शिंदे, नितीन भोसले, सागर देडे आणि पवन बनसोडे, अशी या युवकांची नावे आहेत.

सोलापूरकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन

असा घडला अपघात -

पहाटेची वेळ... तेलंगणा परिवहनच्या बसमधील १८ प्रवाशी गाढ झोपलेले....अचानक बसने रस्त्याच्याकडेला थांबलेल्या ट्रकला जोराची धडक दिली. समोरचा ट्रक बॅटरी वाहतूक करणारा असल्याने त्यातील असंख्य बॅटऱ्यांचा स्फोट झाला अन् प्रवासी वाहतूक करणाऱ्या तेलंगणाच्या बसला आग लागली. सगळीकडे आग आणि धुरांचे लोट. पसरले होते. बसमध्ये अडकलेले प्रवाशी जिवाच्या आकांताने मदतीसाठी हाक देत होते. हा आक्रोश ऐकला हायवे नजीकच्या गावातील विद्यापीठातील आणि व्यायाम करण्यासाठी बाहेर पडलेल्या युवकांनी. मग त्यांनी लगेच धाव घेतली पण, दरवाज्याच्या बाजूने आग लागलेली होती, त्यामुळे आपला जीव धोक्यात घालत या युवकांनी अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बसच्या काचा फोडल्या अन् आपत्कालीन दरवाजा तोडून जखमींचे प्राण वाचवले.. कुठलीही शासकीय यंत्रणा मदतीला नसताना या युवकांनी केलेली मदत लाख मोलाची ठरली.

अपघातानांतर या 6 युवकांनी मदत केली नसती, तर अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असती. दैवबलवत्तर म्हणून सोलापूरकर युवकांनी केलेल्या मदतीमुळे या अपघातात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्तांना मदत करा अन् माणुसकीचे दर्शन घडवा, असा संदेश सोलापूरकरांनी या निमित्ताने दिला आहे.

Last Updated : Jun 7, 2019, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details