सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली आहे. त्यासाठी सोलापूर शहर सज्ज झाले आहे. शहरातील विविध मंडळांनी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापणा केली आहे. तसेच, विविध देखावेही पाहायला मिळत आहेत.
शिवजन्मोत्सवासाठी सोलापूर सज्ज, मंडळांनी उभारले विविध देखावे - सोलापूर
सोलापुरातील सार्वजनिक मंडळे शिवजयंतील साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. विविध देखावे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाने यावर्षी तिरुपती बालाजी मंदिरचाचा देखावा सादर केला आहे. एलईडी दिव्यांच्या सहाय्याने त्यांनी भव्य विद्युत रोशनाई केली आहे. यामुळे शहरवासियांचे लक्ष याकडे वेधले जात आहे. ही रोशनाई पाहण्यासाठी नागतिक गर्दी करत आहेत.
खड्डा तालमीची स्थापना १९८२ साली झाली होती. सण-उत्सवात सामाजिक उपक्रम राबविणे हे खड्डा तालीम मंडळाचे वैशिष्ट्य आहे. सध्या सुनील कामठी हे या मंडळाचे अध्यक्ष असून, शिवजयंतीनिमीत्त राबवत असलेल्या उपक्रमांसंदर्भात त्यांनी माहिती दिली.