सोलापूर- शहरात 10 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील संचारबंदीच्या काळातील नियमांचे सोलापूरकरांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकूश शिंदे यांनी केले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदीच्या काळात पोलीस यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहे. सोलापूरकरांनीदेखील नियमांचे पालन करून संचारबंदीच्या काळात घरातच राहावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले.
संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करा; सोलापूर पोलीस आयुक्तांचे आवाहन - सोलापूर पोलीस आयुक्त
संचारबंदीच्या काळात सोलापूरकरांनी नियमांचे पालन करावे. विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये. सोलापुरातील सर्वांनी सहकार्य केले तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
शहरात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सोलापुरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोलापूर शहरासह जवळच्या 31 गावांमध्ये मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 16 जुलै मध्यरात्री ते 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. या संचारबंदीच्या काळात सोलापूरकरांनी नियमांचे पालन करावे. विनाकारण कोणीही बाहेर फिरू नये. सोलापुरातील सर्वांनी सहकार्य केले तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
कोरोनाला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करायाचे असेल तर पुढील दहा दिवसांच्या कालावधीमध्ये सोलापूरकरांनी संचारबंदीचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे. गरज नसताना कोणीही घराबाहेर पडू नका. तसेच पासच्या निमित्तानेदेखील कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. घरात राहणाऱ्या व घराबाहेर पडणाऱ्यांनी तीन गोष्टी कायम करत राहणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क लावणे तसेच सामाजिक अंतर पाळणे आणि वेळोवेळी हात धुतल्याने कोरोना होण्यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे संचारबंदीच्या काळात घरी असला तरी या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवावे, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.