- ०६ : ०० - भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचा विजयी
- १२:४० - सोलापुरात भाजपची 40 हजार मतांनी आघाडी
- ११:३५ - भाजपचे जयसिद्धेवर महास्वामी ३९ हजार ३५० मतांनी आघाडीवर
- ११:३० -जयसिद्धेश्वर यांना १ लाख ४० हजार ८२१, सुशीलकुमार शिंदेंना १ लाख १ हजार ४७७ तर प्रकाश आंबेडकर यांना ४० हजार ५३४ मते
- १०:४३ - जयसिद्धेश्वर महास्वामी १२ हजार ७२० मतांनी आघाडीवर, सुशीलकुमार शिंदे दुसऱ्या तर प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी
- ९:०७ -सोलापूरात भाजपचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आघाडीवर
- ८:३३- सोलपूरातून सुशीलकुमार शिंदे आघाडीवर
- ८.०० - प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात
- ७.४५ - उमेद्वारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल
- ७.०० - मतमोजणी अधिकारी व कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल.
- सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला रामवाडी येथील गर्व्हर्नमेंट ग्रेन गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडली. या मतदार संघात काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे हे तर डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भाजपकडून निवडणूक रिंगणात होते. तर या दोघांपुढे वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची मानली गेली. यात जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बाजी मारली.
पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून सोलापूर लोकसभेकडे पाहिले जाते. सोलापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. मात्र, २००४ साली भाजपच्या सुभाष देशमुख यांनी तर २०१४ साली शरद बनसोडे यांच्या रुपात भाजपने येथे आपला झेंडा रोवला. मात्र, यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदारांच्या विरोधात जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली. जयसिद्धेश्वर स्वामी हे लिंगायत समाजाचे धर्मगुरू आहेत. त्यामुळे सोलापुरातील लिंगायत समाजाची मते हाही मुद्दा लक्षात घेता त्यांना उमेदवारी देण्यात आली. २०१९ ला हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी जोरदार तयारी सुरु केली होती.
अकोल्यात काँग्रेसने हिदायत पटेलांना उमेदवारी दिल्याने चिडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अॅड. प्रकाश आंबेडकरांनी ऐनवेळी सोलापुरात फॉर्म भरत दलित मतांची गोळाबेरीज केली. त्यामुळे यंदा सोलापूर मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली.