महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात कोरोनाचा कहर सुरूच; शनिवारी 1 हजार 389 रुग्णांची भर - सोलापूर कोरोना

प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र कोरोना विषाणूचे थैमान सुरूच आहे.

Solapur corona
Solapur corona

By

Published : Apr 17, 2021, 9:15 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शनिवारी 1 हजार 389 जणांना कोरोनाची लागण झाली. तर शहरात 16 आणि ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र कोरोना विषाणूचे थैमान सुरूच आहे.

शहरात 252 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामध्ये 148 पुरुष तर 104 महिला बाधित झाले आहेत.16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 10 पुरूष व 6 स्त्रियांचा समावेश आहे. यात माढा, पंढरपूर, बार्शी, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. शहरात अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते दुपारी 1 या दरम्यान सुरु राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details