सोलापूर - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा 590 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. 4 हजार 943 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गावचे कारभारी निवडण्यासाठी सकाळी 7.30पासून सुरुवात झाली.
केंद्र व राज्य सरकारकडून थेट निधी
गावाच्या विकासासाठी थेट ग्रामपंचायतीला निधी देण्याचे केंद्र सरकार व राज्य सरकारचे धोरण आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस वाढली आहे.
12 लाख 85 हजार 921 एकूण मतदार
590 ग्रामपंचायतीमध्ये 12 लाख 85 हजार 921 मतदार आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 307 प्रभागामधून सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी 2 हजार 325 मतदानकेंद्रे आहेत. ग्रामपंचायतिच्या निवडणुकीसाठी 11 हजार 625 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.