महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ganpati visarjan 2022 सोलापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस प्रशासन व गणेश मंडळ आमने-सामने - Police and Ganesh Mandal face each other

सोलापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस प्रशासन व गणेश मंडळ आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजवत असल्याने पोलिसांनी डॉल्बी बंद करायला ganpati visarjan 2022 लावले. यावरून मध्यवर्ती गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व पोलीस प्रशासन आमने सामने आले.

ganpati visarjan 2022
पोलीस प्रशासन व गणेश मंडळ आमने सामने

By

Published : Sep 9, 2022, 6:41 PM IST

सोलापूर - मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजवत असल्याने पोलिसांनी डॉल्बी बंद करायला ganpati visarjan 2022 लावले. यावरून मध्यवर्ती गणेश मंडळाचे कार्यकर्ते,पदाधिकारी व पोलीस प्रशासन आमने सामने Police administration and Ganesh Mandal face each other आले. दोन बेस दोन टॉप वाजवताना पोलिसांनी डॉल्बी बंद केले. दिलेल्या मर्यादेतच डॉल्बी वाजवा अशा सक्त सूचना केल्या. यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लष्कर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी ताबडतोब मिरवणुक थांबवली व ठिय्या आंदोलन सुरू protest of Ganesh Mandal केले. इतर जयंती उत्सवाला दोन बेस व दोन डॉल्बी वाजवण्याची परवानगी दिली जाते तर आम्हाला का नाही असा सवाल गणेश भक्तांनी उपस्थित केला. पोलीस अधिकाऱ्यांनी ताबडतोब एक बेस एक टॉप वाजवा आणि ते ही मर्यादित आवाजात असे सांगत मिरवणुक मार्गस्थ Controversy in Ganesh immersion procession in Solapur केली.

दोन बेस दोन टॉप वाजवण्यावरून वाद - लष्कर येथील जगदंबा चौक परिसरात मध्यवर्ती गणेश मंडळ आहे. अनंत चतुर्थी निमित्ताने मध्यवर्ती गणेश मंडळाने लष्कर येथून भव्य मिरवणुकीची सुरुवात केली. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मिरवणूक सुरू होताच पोलिसांनी डॉल्बी वाजवण्यावरून हस्तक्षेप केला. दोन बेस दोन टॉप वाजवण्यास परवानगी नाही अशा सक्त सूचना केल्या. यावरून गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात वाद सुरू झाला.

गणेश विसर्जन

रस्त्याच्या मधोमध ठिय्या आंदोलन सुरू-डॉल्बी वाजवण्यास मनाई करताच गणेश भक्तांनी ताबडतोब रस्त्याच्या मधोमध ठिय्या आंदोलन सुरू केले. डीसीपी बापू बांगर, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी ठिय्या आंदोलन बंद करा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करू नका असे आदेश दिले. एक बेस एक टॉपची परवानगी देत, कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मर्यादित आवाजात मिरवणूक मार्गस्थ केले काही वेळाच्या तणावनंतर ठिय्या आंदोलन बंद झाले आणि वातावरण निवळले.

ABOUT THE AUTHOR

...view details