सोलापूर- केंद्रीय अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जलशक्ती मंत्रालयासाठी करण्यात आलेल्या तरतुदीचे तसेच शेतीच्या सिंचनासाठी निधी दिल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले. तसेच दुष्काळाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काहीही मिळाले नसल्याची तिखट प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी दिली आहे.
जलशक्ती मंत्रालय आणि त्यासाठी देण्यात आलेल्या निधीमुळे शेतीस कायमस्वरुपी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचे सोलापुरातील शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. सततच्या दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.