सोलापूर- कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरमध्ये कांद्याला देशातील सर्वाधिक दर मिळाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्याच्या कांद्याला प्रतिक्विंटल 20 हजार रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. आज झालेल्या लिलावामध्ये हा दर मिळाला आहे. इतिहासामध्ये 20 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.
सोलापुरात कांद्याला देशातील विक्रमी दर हेही वाचा - सोलापुरात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद; दर पाडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा आरोप
अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील तरुण शेतकरी शिवानंद फुलारी यांनी त्यांचा 3 क्विंटल कांदा आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता. फुलारी यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल 20 हजार रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. मागील 4 ते 5 दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे वाढलेले आहेत.
हेही वाचा -सोलापूर : टेंभुर्णी-अहमदनगर मार्गावरील कालव्यात कार कोसळली, पत्नी ठार
वीस हजार रुपये प्रतिक्विंटल दर हा फक्त 3 क्विंटल कांद्याला मिळाला असला तरीही सर्वसाधारण दर हा 5 ते 6 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढाच आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 250 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. अवकाळी पावसाने शेतातील कांदा नासून गेला असल्यामुळे सध्या जो कांदा आहे त्या कांद्याला चांगला दर मिळताना दिसत आहे.