महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील इंग्रजी शाळांनी पाळला 'काळा दिवस'

'इंडिपेन्डन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन'(ईसा)च्यावतीने गुरुवारी राज्य शिक्षण विभागाच्या निषेधार्थ 'काळा दिवस' पाळण्यात आला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास ८० ते ८५ शाळांमधील मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

शाळांनी पाळला 'काळा दिवस'

By

Published : Jul 19, 2019, 1:50 PM IST

सोलापूर - 'इंडिपेन्डन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन'(ईसा)च्यावतीने गुरुवारी राज्य शिक्षण विभागाच्या निषेधार्थ 'काळा दिवस' पाळण्यात आला . सन २०१२ - १३ ते सन २०१८ - १९ पर्यंतचे थकीत आरटीई शुल्क देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १२ फेब्रुवारी २०१९ रोजी दिले होते. राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. म्हणून 'ईसा'ने गुरुवारी राज्य शिक्षण विभागाच्या विरोधात 'काळा दिवस' पाळला .

इंग्रजी शाळांनी पाळला 'काळा दिवस'


सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास ८० ते ८५ शाळांमधील मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. असोसिएशनचे अध्यक्ष अजय पोन्नम , उपाध्यक्ष अमोल जोशी , नागेश शेंडगे, वर्षा विभुते , शिवानंद शिरगावे , राजाराम चव्हाण आणि रुपाली हजारे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
असोसिएशनच्यावतीने गेल्या सहा ते सात वर्षांपासून इंग्रजी शाळांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष करण्यात येत आहे. इंग्रजी शाळांच्या समस्यांबद्धल शासन दरबारी अनेकवेळा निवेदनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला आहे. मात्र शिक्षण विभागाने याची कसलीच दखल घेतली नाही. म्हणून काळा दिवस पाळावा लागल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अजय पोन्नम यांनी सांगितले.
आरटीई फी परतावा देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, १० वी . च्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्ववत करण्यात यावेत तसेच, सर्व शाळांसाठी सुरक्षा कायदा लागू करण्यात यावा, या मागण्यांकडेसुद्धा शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले. याच मागण्यांसाठी असोसिएशनच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. त्या मोर्चाची दखल शिक्षण विभागाने न घेतल्यामुळे गुरुवारी काळा दिवस पाळून दुसऱ्यांदा शासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details