सोलापूर : लव जिहादचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता याच मुद्द्यावरून तू आमच्या धर्माच्या तरुणींना फसवतो का? असे म्हणत सोलापूरमध्ये एका तरूणाला मारहाण करण्यात आली. असा जाब विचारत संबंधित तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. पीडित तरुणाने लव जिहादचा देखील तक्रारीमध्ये उल्लेख केला आहे. या घटनेमुळे सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल :सोलापूर पोलिसांनी अतिशय सावध भूमिका घेत जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. पोलिसांनी पीडित तरुणाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून 10 ते 15 जणांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जेलरोड पोलिसांनी एका संशयितास अटक करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डोक्यावर व पाठीवर मारहाण : सोलापूर शहरातील महाविद्यालयात एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याकडे काही तरूणी आल्या. नोकरीनिमित्त एका कॉफी शॉपमध्ये बोलत बसल्या होत्या. काही वेळाने संबंधित तरुण हा पायी चालत निघाला. त्या मुलींनी त्याला आपल्या दुचाकी वाहनावरून सोडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या अन्य एका समाजाचे तरुण आले तू आमच्या धर्मातील मुलींसोबत का बोलतो? असा जाब विचारू लागले. काही समजण्याअगोदर 10 ते 15 जणांचे टोळके पीडित तरुणास अक्कलकोट रोड परिसरात असलेल्या एमआयडीसीत घेऊन गेले. त्यास जबर मारहाण केली. त्याच्या डोक्यावर व पाठीवर मारहाण करून महाविद्यालयीन तरुणास जखमी करण्यात आले.