महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खरगे हटाव काँग्रेस बचाव, प्रणिती शिंदेंना मंत्रीपद नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक - , प्रणिती शिंदेंना मंत्रीपद देण्यास मल्लिकार्जुन खरगेंचा अडसर

मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. ते आमदार आपली नाराजी उघड व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनाही मंत्रीमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

solapur congress workers
मल्लीकार्जुन खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By

Published : Jan 3, 2020, 5:09 PM IST

Updated : Jan 3, 2020, 5:51 PM IST

सोलापूर -ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. ते आमदार आपली नाराजी उघड व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनाही मंत्रीमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापूरमध्ये शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जुन खरगे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. तसेच प्रणिती शिंदेंना मंत्रीपद देण्यास खरगेंचा अडसर असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.

प्रणिती शिंदेंना मंत्रीपद नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक

सोलापूर शहरातील पार्क चौकात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या पुतळ्याचे दहन केले. प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या एकमेव आमदार निवडूण आल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा त्या आमदार झालेल्या असतानाही त्यांना मंत्रीपद दिले नाही. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर अन्याय करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

गेल्याच आठवड्यात भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटेंच्या समर्थकांनी त्यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने पुण्याच्या काँग्रेस भवनवर हल्ला चढवला होता. काँग्रेस भवनची तोडफोड केली होती. मात्र, हे कार्यकर्ते माझे नसल्याचे संग्राम थोपटेंनी सांगितले होते. एकंदरच काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येही मंत्रीपद न मिळाल्याने अनेकजण नाराज आहेत.

Last Updated : Jan 3, 2020, 5:51 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details