महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचे रुग्ण आढळल्याने, सोलापुरातील अश्विनी रुग्णालय सील - solapur ashwini hospital seal

शहरातील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी आलेले पेशंट आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. याच ठिकाणावरून कोरोनाची वेगळी साखळी तयार झाली. यामुळे हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे.

solapur ashwini hospital seal by district administration due to coronavirus
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने, सोलापुरातील अश्विनी रुग्णालय सील

By

Published : Apr 30, 2020, 5:17 PM IST

सोलापूर- शहरातील अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी आलेले पेशंट आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. याच ठिकाणावरून कोरोनाची वेगळी साखळी तयार झाली. यामुळे हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे.

अश्विनी रुग्णालयामध्ये उपचार घेणारे रुग्ण तेथील डॉक्टर, नर्स, शिपाई यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब उघड झाली. त्यानंतरही रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. तेव्हा जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरुन संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आले आहे. हे रुग्णालय निर्जंतुकीकरण झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात येईल.

अश्विनी रुग्णालय प्रशासनाने लावलेला बोर्ड...

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल 13 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 81 झाली आहे. बुधवारी सापडलेल्या रुग्णांमध्ये 4 पुरूष व 9 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -सोलापुरात आज आणखी 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण आक़डा 81

हेही वाचा -पोलिसांच्या नियोजनामुळे मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत भाजीपाल्याची खरेदी विक्री सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details