साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद विकोपाला; धर्मराज काडादींवर थोबडेंचा शाब्दिक हल्लाबोल
सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज कडादी यांनी कारखान्याच्या चिमणी बाबत चिथावणीखोर वक्तव्य करत चिमणी पडणाऱ्यांची तंगड्या तोडू असे सांगितले असल्याची माहिती संजय थोबडे यांनी दिली. त्यावर संजय यांनी पत्रकार परिषदेत जाहीर सांगितले की, साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने टेंडर काढले आहे. तर काडादी यांनी मनपा अधिकाऱ्यांची किंवा आयुक्तांची पाय तोडणार का? असा सवाल उपस्थित केला.
साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद विकोपाला; धर्मराज काडादींवर थोबडेंचा शाब्दिक हल्लाबोल
सोलापूर - सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या चिमणीचा वाद विकोपाला गेला आहे. सामाजिक कार्यकर्ते व विमान सेवा सुरू व्हावी यासाठी पुढाकार घेणारे संजय थोबडे यांनी धर्मराज काडादी यांच्यावर सडकून टीका करत सोलापूरी भाषेत प्रतिउत्तर दिले आहे. तसेच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी विमान सेवेला अडथळा ठरत आहे. ही बाब उच्च न्यायालयाने देखील नमूद केली आहे, असे देखील त्यांनी सांगितले.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक बैठक 31 डिसेंम्बर रोजी संपन्न झाली होती. त्यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी कारखान्याच्या चिमणी बाबत चिथावणीखोर वक्तव्य करत चिमणी पडणाऱ्यांची तंगड्या तोडू असे सांगितले असल्याची माहिती संजय थोबडे यांनी दिली. त्यावर संजय यांनी पत्रकार परिषदेत जाहीर सांगितले की, साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने टेंडर काढले आहे. तर काडादी यांनी मनपा अधिकाऱ्यांची किंवा आयुक्तांची पाय तोडणार का? असा सवाल उपस्थित केला.
32 मीटरची परवानगी असताना 90 मिटरची चिमणी उभारली -
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला 32 मीटर चिमणी बांधण्यास परवानगी मिळाली होती. तरी देखील या साखर कारखान्याने 90 मीटर चिमणी उभारली. उच्च न्यायालयाने 32 मीटर चिमणी ठेवा, असा आदेश दिला आहे. त्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेने टेंडर काढले आहे.
धर्मराज कडादी यांना सोलापूरचा पप्पू संबोधले -
ज्या प्रमाणे उत्तर भारतात किंवा राफेल विमान घोटाळ्यात काँग्रेस नेत्याला पप्पू संबोधले तसेच धर्मराज काडादी यांना देखील सोलापूरचा पप्पू म्हणून संजय थोबडे यांनी संबोधले.