सोलापूर - शहरात आज नव्याने सहा रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 21 वर गेली असून त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 19 जणांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुढील चार दिवस सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापुरात कोरोनाचे सहा नवे रूग्ण, एकूण संख्या 21 वर
शहरात आज नव्याने सहा रूग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 21 वर गेली असून त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुढील चार दिवस म्हणजे 23 एप्रिल मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कोणालाही बाहेर पडता येणार नाही. शहरातील काही ठराविकच औषधांची दूकान सुरू राहणार आहेत. तसेच पूढील तीन दिवस भाजीपाला, किराणा दूकान ही देखील बंद राहणार आहेत. शासकीय कार्यालय, बॅंका देखील बंद राहणार असल्यामुळे पासधारकांनी देखील या काळात बाहेर न पडता पुढील तीन दिवस घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
पुढील चार दिवस सकाळी 6 ते 9 या वेळेत फक्त दूधाचे वितरण केले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर आणि इतर अधिकारी यांनाच बाहेर पडण्यास मुभा राहणार आहे. या आगोदर पास दिलेल्या व्यक्तींना देखील पूढील चार दिवस बाहेर पडता येणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.