सोलापूर-सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात आरोग्य सेवा देण्यासाठी सोलापुरातून सहा पथके सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा तात्काळ मिळाव्यात यासाठी सोलापुरातील शासकीय मेडिकल कॉलेजमधील ही सात पथके अत्यावश्यक औषधे घेऊन सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत.
सोलापुरातून आरोग्य सेवेची 6 पथके सांगली कोल्हापूरला रवाना, पूरग्रस्त भागात देणार आरोग्य सेवा
मागील काही दिवसात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचे पाणी साचलेले असल्यामुळे येत्या काळात आरोग्याचे प्रश्न उपस्थित होणार आहेत. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा तात्काळ मिळाव्यात यासाठी ही पथके रवाना झाली आहेत.
मागील काही दिवसांपासून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातले आहे. पूर परिस्थिती भयानक झाली होती. अशातच अनेक ठिकाणी मदतकार्य देखील पोहचविणे अवघड झाले होते. आता पूर ओसरला आहे. मागील काही दिवस दोन्ही जिल्ह्यात पुराचे पाणी साचलेले असल्यामुळे येत्या काळात आरोग्याचे प्रश्न उपस्थित होणार आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा तात्काळ मिळाव्यात यासाठी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच सिविल हॉस्पिटल येथील सहा पथके सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे रवाना झाली आहेत.
पथकासोबत पूर परिस्थितीमध्ये उपचारासाठी लागणारे अत्यावश्यक औषध देण्यात आलेली आहेत. तसेच जोपर्यंत आरोग्यसेवा गरजेची आहे तोपर्यंत ही पथकं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आरोग्य सेवा देणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आला आहे.