सोलापूर - निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे. प्रत्येक पक्ष, उमेदवार जोरदार प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. सोलापूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे प्रचाराला लागले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या मुली आज प्रचारात उतरलेल्या दिसल्या. आमदार प्रणितीसह स्मृती आणि प्रीती यांनी वडिलांच्या प्रचारात सहभाग घेतला.
वडिलांसाठी मुली मैदानात.. सुशीलकुमार शिंदेंसाठी प्रणिती, स्मृती व प्रीती यांचे मतदारांना आवाहन - लोकसभा
स्मृती शिंदे यांनी सुशिलकुमार शिंदेंना निवडून देण्याचे आवाहन लोकांना केले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, की ही निवडणूक देशाचे अस्तित्व वाचवण्याची निवडणूक आहे. ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. त्यामुळे सगळ्यांनी काँग्रेसला मतदान करावे.
सुशिलकुमार शिंदे यांच्या तीन मुली आहेत. यातील प्रणिती शिंदे या राजकारणात आहेत. तर स्मृती शिंदे या दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट निर्मिती करतात. आज त्यांच्या तिन्ही मुलींनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला. मुलींसह स्वतः सुशिलकुमार शिंदेही प्रचार रॅलीत दिसून आले.