महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! स्वत: रचलेल्या सरणावर जाळून घेत शेतकरी महिलेची आत्महत्या - police

स्वतःच्या हाताने सरण रचून सरणावर जाळून घेत शेतकरी महिलेने आत्महत्या केली आहे. कॅन्सर या आजाराला कंटाळून वनमाला शिंदे यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे.

शेतकरी महिलेची आत्महत्या

By

Published : Jul 19, 2019, 3:15 PM IST

सोलापूर- स्वतःच्या हाताने सरण रचून सरणावर जाळून घेत शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालूक्यातील कूसळंब येथे घडली आहे. कुसळंब गावातील वनमाला शिंदे (वय 48) या शेतकरी महिलेने गुरुवारी पहाटेच्या सुमारास स्वतःला जाळून घेतल्याची घटना घडली. सुरुवातीला या घटनेबाबत खून असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आजाराला कंटाळून वनमाला शिंदे यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर येत आहे.

वनमाला या शेतकरी महिलेने स्वतःच्या शेतात मध्यरात्रीच्या सुमारास बोरीच्या काठ्यांचे सरण रचले. स्वतः रचलेल्या या सरणावर चढून त्यांनी पेटवून घेतले. या सर्व प्रकारानंतर वनमाला यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला, अशी चर्चा काल दिवसभर गावासह तालुक्यात सुरू होती. मात्र अधिक माहिती घेतली असता वनमाला शिंदे या कॅन्सरने पीडित होत्या आणि या आजाराला कंटाळूनच त्यांनी स्वतःला जाळून घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

वनमाला या पती पोपट आणि मूलगा हर्षद यांच्या सोबत एकत्रित शेती करायच्या. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 17 जुलै रोजी शिंदे कुटुंबातील सर्वजण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करून झोपी गेले. वनमाला या घरात गरम होत असल्यामुळे गच्चीवर जाऊन झोपल्या होत्या. पहाटेच्या वेळी मूलगा हर्षद व पोपट शिंदे हे शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतात गेल्यावर बोरीच्या बागेजवळ काहीतरी जळत असल्याचे दिसते. जवळ जाऊन पाहिले असता बोरीच्या काट्याच्या सरणावर अर्धवट जळालेले प्रेत दिसून आले. सुरूवातीला अर्धवट जळालेल्या प्रेताची ओळख पटत नव्हती, मात्र शिंदे कुटुंबातील महिलांना प्रेताच्या हातातील बांगड्यावरून ते अर्धवट जळालेले प्रेत हे वनमाला शिंदे यांचेच असल्याचे कळले.

वनमाला पोपट शिंदे यांच्या मृत्यू संदर्भात त्यांचा मूलगा हर्षद शिंदे यांनी बार्शी तालूका पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details