सोलापूर- जिल्ह्यातील अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य या 2 विधानसभेच्या जागा भाजपने शिवा संघटनेला सोडाव्यात, अशी मागणी शिवा संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत वीरशैव समाजाची मते भाजपला मिळाली आहेत. तसेच त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवा संघटनेला विधानसभेच्या जागा देऊ, असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळावा, असे आवाहनही युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर तसेच अक्कलकोट तालुक्यामध्ये लिंगायत समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागात शिवा संघटनेचीची ताकद असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहर मध्य व अक्कलकोट या 2 विधानसभेच्या जागा शिवा संघटनेला सोडाव्यात, अशी मागणी शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.