सोलापूर - देवेंद्र फडणवीसांवर असे शंभर खटले टाका, महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वर्ष निष्कलंक कारकीर्द कुठलाही मुख्यमंत्री आत्तापर्यंत करू शकला नाही. ( Fadnavis alleged non-disclosure criminal cases registered against election affidavit 2014. ) त्यामुळे आत्तापर्यंत एक रुपयाचा डागही त्यांच्या चारित्र्यावर लागलेला नाही. या सर्वांचे उत्तर न्यायालय योग्यवेळी देईलच, त्यामुळे अशा खटल्यांना आम्ही भीक घालत नाही, ( Court Frames Charges Against Devendra Fadnavis ) अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. दरेकर हे एका लग्ना समारंभासाठी मंगळवारी (दि. 7 डिसेंबर)रोजी सोलापुरात आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेचे केंद्रबिंदू गांधी घराणं झालं आहे
काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. ( Hindutva by Shiv Sena ) अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होते. मात्र, आता शिवसेनेचा केंद्रबिंदू हे गांधी घराणे झाला आहे. त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे. ( Congress, NCP, Shiv Sena ) शिवसेना या अगोदरच काँग्रेसबरोबर गेली आहे. आता ती यूपीएत गेली तर काही मोठा फरक पडणार नाही. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळणार