महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला.. विखे पुत्रासाठी काँग्रेसला सोडली जागा - LOKSABHA

लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघाचा वाद मिटला... सुजय विखेंसाठी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचे शरद पवारांचे सोलापुरात स्पष्टीकरण....

शरद पवार

By

Published : Mar 1, 2019, 9:47 PM IST

सोलापूर- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेचा मतदारसंघ असलेल्या अहमदनगरच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला असून नगरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. विखे-पाटलांच्या मुलासाठी राष्ट्रवादीने ही जागा सोडली असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्पष्ट केले.


शरद पवार आज अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याकडून आयोजित कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी अहमदनगर लोकसभा जागा कुणी लढवायची याचा निर्णय झाला आहे का ?याबाबत विचारले असता, ती जागा काँग्रेसला सोडल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार


बालाकोट मधील अतिरेकी तळावर भारतीय वायू दलाने हल्ला केला. याप्रकरणी तीनही सैन्य दलाने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मात्र, यात कुठेही तीनशे अतिरेकी ठार झाल्याच सांगितले नाही. अमेरिका आणि इंग्लंड मधील वृत्त पत्रामध्येही काही बातम्या आल्या. याबाबत देशातील जनतेच्या मनात असलेली शंका सरकारने दूर करावी, की भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईक नक्की किती अतिरेकी ठार झाले हे सांगावे.


पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीत तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या मिळाल्या नाहीत. पुलवामा हल्ला झाला त्यात काश्मीर मधलेही तरुण सहभागी होते, अशी शंका आहे. नोकऱ्या नसल्याने नैराश्यातून ते अशा मार्गाला लागले असावेत, असा आरोप पवारांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details