पंढरपूर (सोलापूर) -राज्य शिक्षण विभागाकडून उपक्रमशील शिक्षक व अधिकारी विचार गट स्थापन केला आहे. त्या गटांमध्ये माढा येथील ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले व महानगरपालिका प्रशासन अधिकारी कादर शेख यांची निवड करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागामध्ये शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा म्हणून ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्यातून समितीवर तीस जणांची निवड
जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डीसले व महापालिका अधिकारी कादर शेख यांच्यासह शिक्षण विभागाकडून नवीन संकल्पना असणाऱ्या तीस जणांची समितीवर निवड करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष शिक्षण आयुक्त विशाल साळुंखे असून उपाध्यक्षपदी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणून दिनकर टेमकर हे कामकाज पाहणार आहेत. सचिव म्हणून शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे आयटीचे प्राचार्य विकास गरड हे असणार आहे.