सोलापूर - संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखीच्या घोड्याचे उभं रिंगण सोमवारी माळशिरस तालुक्यातील माळीनगरला पार पडले. माळीनगरच्या मुख्य रस्त्यावर अश्वाने धाव घेताच विठुनामाचा एकच गजर झाला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला.
तुकाराम महाराज पालखीच्या अश्वाने माळीनगरमधील रस्त्यावर घेतली धाव, विठुनामाच्या गजरात उभे रिंगण उत्साहात - दिंडी सोहळा
माळीनगरचे हे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शेवटचं रिंगण. यानंतर आता वाखरीला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण होणार आहे.
संत तुकाराम महाराज पालखीच्या अश्वाचे उभं रिंगण माळीनगरला संपन्न
कालचा अकलूजचा मुक्काम संपवून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पुढे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. वाटेत माळीनगरला उभा रिंगण सोहळा झाला. पुढे पंचवीस पायरी, मळखांबी, श्रीपुरमार्गे बोरागावी मुक्कामी राहणार आहे. प्रवासात माळखांबीला माकडांशी मैत्री ठेवत हे अंतर कापणार आहेत.
माळीनगरचे हे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शेवटचं रिंगण. यानंतर आता वाखरीला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण होणार आहे.