सोलापूर -संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज इंदापूर तालुक्यातील सराटी इथे निरा स्थान घालण्यात आले. पालखी सोहळ्यात निरास्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या गरजरात हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नीरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती.
आषाढी वारी: संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना 'नीरा स्नान', सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - aashadi
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज इंदापूर तालुक्यातील सराटी इथे निरा स्थान घालण्यात आले. पालखी सोहळ्यात निरास्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या गरजरात हा सोहळा संपन्न झाला.
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना 'नीरा स्नान'
आज तुकाराम महाराजांच्या दिंडींचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. नीरा स्नानाला विशेष महत्व आहे. पूर्वी या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी आल्यावर नदी ओलांडण्यास पूल नव्हता, तेव्हा कोळीबांधव पालखी होडीतून पलीकडे नेत असत. काही काळानंतर येथे पूल बांधण्यात आला. त्यानंतर पालखी पुलावरुन जाऊ लागली. त्यामुळे कोळीबांधवांचा सन्मान म्हणून तुकाराम महाराजांच्या पादुकांना दरवर्षी निरास्नान घातले जाते.