सोलापूर - हुतात्मा दिनी सोलापूर शहरातील प्रत्येकजण श्रीकिसन सारडा, कुर्बान हुसेन, मल्लपा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करतात. आज सकाळी संभाजी आरमारचे कार्यकर्ते व पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी आले असता, चारही पुतळ्यांची दुरवस्था पाहून ते आक्रमक झाले. आणि काही वेळातच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत येऊन मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
माहिती देताना संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे हेही वाचा -नंदीध्वजाचे पूजन करून सिद्धेश्वर महायात्रेला प्रारंभ
श्रीकिसन सारडा, कुर्बान हुसेन, मल्लपा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. इंग्रजांनी त्यांना 12 जानेवारी 1931 रोजी येरवडा (पुणे) येथे तुरुंगात फासावर चढवले होते. या चार हुतात्म्यांमुळे सोलापुरात इंग्रजांनी मार्शल लॉ पुकारला होता.
आंदोलनाची स्टंटबाजी, मात्र सुशोभीकरणाकडे दुर्लक्षच-
अनेक राजकीय संघटना किंवा राजकीय पक्ष सदर हुतात्म्यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाची स्टंटबाजी करतात. मात्र, त्यांच्या पुतळ्याकडे पाठ करून जातात. कधीच कोणताही राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष जातीने या हुतात्म्यांच्या पुतळ्यांचे स्वखर्चाने सुशोभीकरण करत नाही. महापालिका प्रशासन देखील लक्ष देत नाही.
संभाजी आरमारने हुतात्मा दिनी महापालिकेत केला ठिय्या-
संभाजी आरमारच्या वतीने आज अभिवादन कार्यक्रम केला होता. मात्र, हुतात्मा दिनी सोलापूर महापालिका प्रशासनाने चारही हुतात्म्यांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नव्हते, त्यामुळे संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पालिकेत येऊन ठिय्या केला. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबत तात्काळ दखल घेत कारवाई केली.
हेही वाचा -ग्रामपंचायत निवडणूक : पंढरपूरमधून 134, तर अकलूजमधून 62 आरोपी हद्दपार