सोलापूर- पुणे जिल्ह्यातला प्रवास संपवून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज ज्ञानोबामाऊली-तुकाराम’च्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. पालखी शहरात दाखल झाल्यानंतर दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले.
संत तुकाराम महाराज दिंडी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन - tukaram maharaj
पालखी शहरात दाखल झाल्यानंतर दर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह प्रशासन आणि माळशिरस पंचायत समितीच्यावतीने दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, त्यांच्यापाठोपाठ मानाचे विणेकरी, झेंडेवाले, वारकरी व भाविक ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष करत सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अकलूजच्या सदाशिवराव माने प्रशालेच्या मैदानावर तुकाराम महाराज पालखीचे रिंगण पार पडणार आहे.