महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RPF Jawan News : सोलापूर रेल्वे स्टेशनवरील आरपीएफ जवानांनी सीपीआर देऊन वाचवले प्रवाशाचे प्राण

सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या जनरल कोचमधील जनरल कोचमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. तेथे असलेल्या आरपीएफ जवानांना याची कल्पना झाली त्यांनी त्या प्रवाशाला रेल्वे डब्ब्यातून बाहेर काढून सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले.

आरपीएफ जवानांनी प्रवाशाचे वाचवले प्राण
आरपीएफ जवानांनी प्रवाशाचे वाचवले प्राण

By

Published : Jun 12, 2023, 2:33 PM IST

आरपीएफ जवानांनी सीपीआर देऊन वाचवले प्रवाशाचे प्राण

सोलापूर: येथील रेल्वेस्थानकावर एका प्रवाशासाठी आरपीएफ जवान देवदूत बनला. स्थानकावर थांबलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील जनरल कोचमध्ये बसलेल्या एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. सोलापूर रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या आरपीएफ जवानांना याची कल्पना आली. त्यांनी प्रसंगावधान साधत प्रवाशाला रेल्वे बुगीतून बाहेर काढले त्याच्या छातीवर हाताने पंपिंग करत त्याचा श्वास मोकळा केला. सादिक इस्माईल पटेल(वय 45 रा,रामवाडी ,सोलापूर) असे प्रवाशाचे नाव आहे. ही घटना 11 जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर घडली होती. ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवान एएसआय अजय महाजन व एएसआय एम.पी.सिंह या दोन जवानांनी हार्ट अटॅक आलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवले.

प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका : रविवारी 11 जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे ट्रेन क्रमांक 226801 सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबईकडे रवाना होणार होती. सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये मोठी गर्दी होती. गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून आरपीएफ जवान अजय महाजन आणि एमपी सिंह हे जवळच थांबून गर्दीवर नियंत्रण मिळवत होते. सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील जनरल कोचमध्ये बसलेल्या सादिक पटेल यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सादिक पटेल यांचा श्वास रोखला गेला होता. त्यावेळी इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर असलेल्या आरपीएफ जवानांना माहिती याची कल्पना दिली.

आरपीएफ जवान झाले देवदूत : जवान अजय महाजन आणि एम.पी सिंह यांनी हार्ट अटॅक आलेल्या सादिक पटेल यांना ताबडतोब जनरल कोचमधून प्लॅटफॉर्मवर असलेल्या बाकड्यावर प्रवाशी सादिक पटेल यांना झोपवले. त्यांच्या छातीवर दाब देत सीपीआर दिले. श्वास रोखल्या गेलेल्या सादिक पटेल यांचा एक मिनिटांत श्वास सुरू झाला. छातीवर पंपिंग केल्याने काही सेकंदात सादिक पटेल उठून बसले. एम.पी.सिंह आणि अजय महाजन यांनी आणि इतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. सोलापूर रेल्वे स्थानकावर असलेल्या इतर प्रवाशांनी आणि आरपीएफ जवानांनी ताबडतोब प्रवाशी सादिक पटेल यांचे नातेवाईक राजेसाब पटेल यांना याबाबत माहिती दिली. नातेवाईक ताबडतोब रात्रीच सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले आणि सादिक पटेल यांना घरी घेऊन गेले. प्रवाशी सादिक पटेल यांची माहिती घेतली असता ते सुखरूप आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details