सोलापूर - करमाळा तालुक्यातील रिटेवाडी या गावाला सन १९७६ सालापासून रस्ता नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. संपूर्ण गावाने मतदानच न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्त्यासाठी रिटेवाडीच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
१९७६ पासून ग्रामस्थ रस्त्यासाठी मागणी करत आहेत, परंतु प्रशासन राजकीय मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
रस्त्यासाठी रिटेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
करमाळा तालुक्यापासून २५ किलोमीटर व उमरेड ते मांजरगाव या रस्त्यापासून ३ किलोमीटर अंतरावर रिटेवाडी हे गाव आहे. सन १९७६ पासून ग्रामस्थ रस्त्यासाठी मागणी करत आहेत, परंतु प्रशासन राजकीय मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, यामुळे ग्रामस्थांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. शुक्रवारी रिटेवाडी गावातील महिला पुरुष जनावरांसह करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असून यावेळी त्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.