महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 25, 2020, 11:07 AM IST

ETV Bharat / state

पंढरपूर; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भंग पावलेल्या मूर्तींची नव्याने प्राणप्रतिष्ठाना

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिवार देवतातील प्राणप्रतिष्ठानामध्ये श्री धुंडिराज गणपती, श्री चिंतामणी गणपती, सोळखांबी गणपती, श्री दत्त, श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मूर्ती, श्री विष्णू, श्री खंडोबा, श्री शनि, श्री नवग्रह, श्री हणमंत (मारुती) व श्री गरुड या मूर्ती भंग पावल्या होत्या. पावलेल्या मूर्ती नव्याने तयार करून विधिवत प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली. मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस हा विधी करण्यात आला.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भंग पावलेल्या मूर्तींची नव्याने प्राणप्रतिष्ठाना
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भंग पावलेल्या मूर्तींची नव्याने प्राणप्रतिष्ठाना

पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व परिवार देवतातील जीर्ण झालेल्या काही मूर्ती बदलण्यात आल्या आहेत. श्री विठ्ठल मंदिरातील परिवार देवतांपैकी काही मूर्ती भंग पावल्या होत्या. या भंग पावलेल्या मूर्ती नव्याने तयार करून गुरुवारी त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली. मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणप्रतिष्ठाना झाली.

असा होता प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा-

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिवार देवतातील प्राणप्रतिष्ठानामध्ये श्री धुंडिराज गणपती, श्री चिंतामणी गणपती, सोळखांबी गणपती, श्री दत्त, श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मूर्ती, श्री विष्णू, श्री खंडोबा, श्री शनि, श्री नवग्रह, श्री हणमंत (मारुती) व श्री गरुड या मूर्ती भंग पावल्या होत्या. पावलेल्या मूर्ती नव्याने तयार करून विधिवत प्राणप्रतिष्ठाना करण्यात आली. मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस हा विधी करण्यात आला.

पंढरपूर; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भंग पावलेल्या मूर्तींची नव्याने प्राणप्रतिष्ठाना

पहिल्या तीन दिवसांत कलाकर्षण विधी, जुन्या भंग पावलेल्या मूर्तींचे तेज काढून घेण्याचा विधी करण्यात आला. चौथ्या दिवशी या सर्व मूर्तींचे हवन करण्यात आले. पाचव्या दिवशी सर्व मूर्तींवर जलाधिवास विधी करून स्तपन विधी करण्यात आला. त्यानंतर नवीन मूर्तींना शैयाधिवास व धान्याधिवास करून सात दिवसात हा विधी तसेच नवग्रह, स्थापत्य देवतांचे हवन, आरोहण असे यज्ञकर्म करण्यात आले. त्यानंतर त्या त्या मूर्तींची ब्रह्मवृंदांच्याव्दारे विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सर्व विधीस यजमान म्हणून मंदिर समितीचे विभाग प्रमुख पदावरील कर्मचारी सपत्नीक उपस्थित होते.

याप्रसंगी शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, सल्लागार परिषदेचे सदस्य प्रसाद महाराज अमळनेरकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते.

हेही वाचा-गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करा; नाताळनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

हेही वाचा-2020 वर्षातील सर्वाधिक चर्चिलेले प्रकरण : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details