महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश - सुभाष देशमुख - सातारा

माढा लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह मोहिते-पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज माण तालुक्यात केले.

सोलापूर

By

Published : Mar 19, 2019, 4:15 PM IST

Updated : Mar 19, 2019, 4:20 PM IST

सोलापूर - माढा लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह मोहिते-पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज माण तालुक्यात केले.

राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित नसल्याने भाजपने देखील माढा मतदारसंघातून उमेदवार कोण? हे गुलदस्त्यात ठेवले होते. आज राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजीच्या फायदा घेत भाजपने रणजितसिंह मोहिते-पाटील यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. त्यामुळे भाजपने नगर पाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे राजकीय घराणे आपल्या सोबत घेण्यात यश मिळवले आहे.

Last Updated : Mar 19, 2019, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details