महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमच्यावरच्या वैयक्तिक टीकांना माढ्याची जनता मतदानातून उत्तर देईल - रणजितसिंह

रणजितसिंह मोहिते-पाटलांनी सहकुटुंब अकलुजमध्ये बजावला मतदानाचा हक्क्... म्हणाले निवडणुकीत विकासाच्या मुद्दा सोडून केवळ मोहिते पाटलांवर टीका.. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आकलूजच्या दत्त चौक अंगणवाडी शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा यशवंत नगर येथे सहकुटुंब मतदान केले.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सह कुटुंब बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Apr 23, 2019, 11:35 AM IST

सोलापूर- माढा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विकासावर न बोलता केवळ मोहिते -पाटलांवर टीका करण्यात आली. विरोधकांच्या या वैयक्तिक टीकेला माढ्याचा मतदार मतदानातून उत्तर देईल, असा दावा माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते रणजितसिंह मोहिते-पाटलांनी केला आहे. ते अकलूजमध्ये मतदानानंतर बोलत होते.

मोहिते पाटील -मतदानानंतर पतिक्रिया देताना

राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या मतदारसंघात ज्यांच्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठतेची झाली, त्या मोहिते-पाटील परिवाराच्या सदस्यांनी अकलूजमध्ये मतदान केलं. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आकलूजच्या दत्त चौक अंगणवाडी शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला. तर खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा यशवंत नगर येथे सहकुटुंब मतदान केले.

राजकीय खच्चीकरणामुळं राष्ट्रवादीशी बंड करत रणजितसिंहांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली अन् त्यांची जबाबदारी मोहिते-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. संजय शिंदे भाजपला सोडून गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही जागा प्रतिष्ठतेची केली आहे. राजकीय कुरघोड्यांनंतर शरद पवार यांनी भाजपच्या सहयोगी आणि मोहित्यांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांना राष्ट्रवादीकडून मैदानात उतरविले आहे. त्यामुळं हा मतदारसंघ लक्ष्यवेधी ठरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणूक अधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची ठरली आहे. आज मतदारसंघात माढ्याचा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तो कुणाला कौल देतोय ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details