महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फालतू आणि भामट्या लोकांना सोबत घेणार नाही, राजू शेट्टींंचे सदाभाऊ खोतांवर शरसंधान - sadabhau khot

फालतू आणि भामट्या लोकांना कधीही सोबत घेणार नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला आहे.

Raju shetty criticised sadabhau khot
फालतू आणि भामट्या लोकांना सोबत घेणार नाही, राजू शेट्टींंचे सदाभाऊ खोतांवर शरसंधान

By

Published : Aug 17, 2020, 5:31 PM IST

सोलापूर -फालतू आणि भामट्या लोकांना कधीही सोबत घेणार नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला आहे. काही दिवसापूर्वी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर पंढरपूरमध्ये टीका केली होती. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर शरसंधान साधला आहे.

फालतू आणि भामट्याना कधीही सोबत घेऊन आंदोलन करणार नाही, असे म्हणत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखालीच आंदोलन यशस्वी होत असते. इतर अनेक जण आंदोलन करत असतात. मात्र यश हे फक्त स्वाभिमानीच्या आंदोलना येत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी जो पर्यंत आक्रमक होत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही, असेही शेट्टी म्हणाले.

फालतू आणि भामट्या लोकांना सोबत घेणार नाही, राजू शेट्टींंचे सदाभाऊ खोतांवर शरसंधान

हेही वाचा -पंढरपूर परिसरात दमदार पाऊस, वीर धरणातून नीरा नदीत 32000 क्युसेकचा विसर्ग

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी देखील दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारलेले होते. मात्र, सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. आज राजू शेट्टी यांनी सोलापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या मोर्चाच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाना साधला आहे.

हेही वाचा -वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेतील मंदिराना पाण्याचा वेढा

ABOUT THE AUTHOR

...view details