पंढरपूर -महाराष्ट्र राज्य मास्क मुक्ती ( Mask Free Maharashtra ) असण्याचे कारणच नाही. युरोपमधील राष्ट्रांनी मास्क बाबत जो निर्णय घेतला आहे, त्यावर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. मात्र राज्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope on Mask Free Maharashtra ) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आज विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन ( Rajesh Tope in Solapur ) घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्याहस्ते शाल, श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पी.के.कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम उपस्थित होते.