महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी-शाह दुकलीविरोधात आज सोलापूरात धडाडणार राज ठाकरेंची तोफ.. सभेची जय्यत तयारी

या सभेचे सोलापूरकरांत कुतूहल असून आज राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेला आज सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे.

By

Published : Apr 15, 2019, 1:17 PM IST

संग्रहीत छायाचित्र

सोलापूर -नांदेडनंतर आज सोलापुरात मोदी-शहांच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. कर्णिक नगर येथील विशाल मैदानावर ही सभा होत आहे. सभास्थळी एक लाखांवर जनसमुदाय गृहीत धरून सभेचे नियोजन करण्यात आले आहे.

सभेच्या तयारीचा आढावा घेताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी प्रवीण सपकाळ

मनसेचे स्थानिक नेते सभेच्या तयारीत व्यस्त असून मुंबईतील वरिष्ठ नेते प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत आहेत. या सभेचे सोलापूरकरांत कुतूहल असून आज राज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेला आज सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार असून आतापासूनच ग्रामीण भागातून मनसैनिक यायला सुरुवात झाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details