महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pandharpur Accident : पंढरपूरमध्ये रेल्वे मालगाडीने चार मजूरांना उडवले; दाेघांचा मृत्यू, दाेघे गंभीर जखमी - Pandharpur Accident

पंढरपूर येथे रेल्वेच्या धडकेत दाेन मजूरांचा मृत्यू ( Two laborers killed in train collision ) झाला आहे. या घटनेत अन्य दाेघे जण जखमी झाले ( Two laborers injured ) आहेत. रेल्वे मालगाडी कुर्डूवाडीहून मिरजकडे जाताना हा अपघात झाला.

Pandharpur Accident
पंढरपूर अपघात

By

Published : Aug 3, 2022, 11:49 AM IST

पंढरपूर -पंढरपूर येथील रेल्वे स्टेशन नजीक टाकळी पुलाजवळील उड्डाण पुलाजवळ रेल्वेच्या धडकेत दाेन मजूरांचा मृत्यू ( Two laborers killed in train collision ) झाला आहे. या घटनेत अन्य दाेघे जण जखमी झाले ( Two laborers injured ) आहेत. जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. धडक दिलेली रेल्वे मालगाडी कुर्डूवाडीहून मिरजकडे जात होती ( accident occurred while train going from Kurduwadi to Miraj ).

परप्रांतीय मजूरांचा मृत्यू -या घटनेत परप्रांतीय मजूर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेतील दाेन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ( injured admitted in hospital for treatment ) .घटनास्थळी आज (बुधवार) सकाळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांनी भेट दिली.

रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू -या घटनेबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनूसार बुधवार पाहटेच्या सुमारास टाकली पुलाजवळ चार नागरिकांना रेल्वेने धडक दिली. या रेल्वे अपघातात दोन बांधकाम मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. कुर्डुवाडीहून मिरजकडे जाणा-या मालगाडीने रूळावर बसलेल्या चार मजूरांना उडवलं. त्यात दाेघे ठार झाले. तर दोघे जखमी गंभीर जखमी झाले. हे चारही मजूर छत्तीसगड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या चाैघांची ओळख पटविण्याचे काम सध्या रेल्वे पोलीस करीत आहेत.हा अपघात आहे की आत्महत्या अशीही चर्चा नागरिकांमध्ये सध्या सुरू आहे.

हेही वाचा -Chawl culture Of Mumbai: कोळी बांधवांनी उभारली मुंबईत पहिली चाळ, कसा आहे इतिहास जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details