सोलापूर - शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. सत्तेवर येताना २ कोटी युवकांना रोजगाराचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने देशांतील युवकांची घोर निराशा केली. तसेच रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योग आणि सेवा क्षेत्राचे कंबरडे मोडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सोलापुरात राष्ट्रवादीचे 'जवाब दो' आंदोलन
सरकारी निर्णयांचे दुष्परिणाम म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत बेरोजगार युवकांची संख्या वाढली. ही वाढलेली संख्या नकारात्मक भावनेतून गुन्हेगारीकडे वळली आहे. त्यामुळे देशात तसेच राज्यात गुन्ह्यांमध्ये तरुणांचा सहभाग वाढत चालला. याच गोष्टींचा जवाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंदोलन करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्तेनोटाबंदीनंतर २ वर्षात देशात जवळपास सव्वा कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कंबरडे मोडले ते रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योग आणि सेवा क्षेत्राचे. नोटबंदीच्या संकटातून देश सावरण्यापूर्वीच जीएसटी लागू करून व्यापारी वर्गावर कुऱ्हाड चालवण्यात आली. त्यामुळे सर्वत्र मंदी आली. पर्यायाने रोजगाराच्या संधी कमी झाल्या. त्यामुळे युवकांच्या बेरोजगारीत वाढ झाली. या सर्व बाबींना मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.