महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस उपनिरीक्षकाची सामाजिक बांधिलकी; लग्नाचा खर्च टाळत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 लाखांची मदत - प्रवीण साने यांची मुख्यमंत्री निधीला मदत

देशावर कोरोनाचे संकट असल्याने आणि जनसामान्यांची होत असलेली परवड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी लक्षात घेऊन लग्नास होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता १ लाख रुपयांचा धनादेश पिंपरी चिंचवड महापालिकाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

Psi pravin sane donate one lakh to cm relief fund
पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

By

Published : Jun 1, 2020, 10:53 AM IST

करमाळा(सोलापूर)-लग्नाचा अनावश्यक खर्च टाळून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी साधेपणाने लग्न करत कोरोनाच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख रुपये दिले आहेत. करमाळा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रवीण साने यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देत कोरोना विरोधातील लढाईविरोधात खारीचा वाटा उचलला आहे.

कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले २ महिन्यापासून ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या कर्तव्यसोबतच करमाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणारे प्रवीण साने यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपले लग्न साधेपणाने केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री सहायता मदत निधी म्हणून १ लाखाची मदत करून आपणही कोरोनाच्या लढ्यात आहोत हे दाखवून दिले. प्रवीण साने या निर्णयामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.त्यांनी करमाळा येथे ४५ दिवस कोरोनाच्या दरम्यान सेवा बजावली आहे व त्यानंतर विवाह केला आहे.

प्रवीण धर्माजी साने यांचा विवाह विलास बबन गाढवे रा. आर्वी ता जुन्नर यांची कन्या स्नेहल हिच्याशी २७ मेला पिंपरी चिंचवड येथे होणार होता. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे व असलेल्या लाँकडाऊनमुळे दोन्हीकडील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा आर्वी येथे पार पडला.

सामाजिक अंतर ठेवत वधू-वरासह सर्वांनी तोंडाला मास्क बांधून हा विवाह सोहळा पार पडला.अत्यंत साधेपणाने व आदर्श पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबाने घेतला. कोरोनाच्या संकटामुळे आवश्यक ती खबरदारी घेत कुठलाही बडेजाव न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रवीण व स्नेहल यांचा विवाह आदर्श पध्दतीने पार पडला.लग्नात नवंदांपत्याने एकमेकांना मास्क व सॅनिटायजझर भेट देत आयुष्यातील नव्या वाटचालीस सुरुवात केली.

देशावर कोरोनाचे संकट असल्याने आणि जनसामान्यांची होत असलेली परवड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने यांनी लक्षात घेऊन लग्नास होणारा अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता १ लाख रुपयांचा धनादेश पिंपरी चिंचवड महापालिकाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची बाब असते. त्याबाबत दोन्ही कुटुंबाने खूप स्वप्ने पहिली होती. थाटामाटात विवाह करण्याचा मानस होता परंतु कोरोनामुळे सर्व जागी थांबले. विवाह थाटामाटाने करण्याऐवजी आदर्श पद्धतीने पार पडला व दोन्ही कुटुंबांनी एक नवीन आदर्श उभा केलाय आणि ही गोष्ट आयुष्यभर स्मरणात राहील, असे मत नवदांपत्य प्रविण व स्नेहल यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीमुळे अनेकांच्या स्वप्नांवर मनसुब्यांवर पाणी फेरले. तर अनेकांनी याला एक संधी समजून सकारात्मक दृष्टिकोन बाळगत त्या संधीला अविस्मरणीय केले आहे. खास करून या काळात लग्न बंधनात अडकलेल्या नवंदांपत्यसाठी त्यांचा विवाह सोहळा आजन्म अविस्मरणीय राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details