करमाळा तालुक्यातील सोगाव येथे नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग - करमाळा कोरोना पेशंट
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी करमाळा तालुक्यातील सोगाव येथे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
सोलापूर - कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील 500 नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले आहे.
याआधी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावात मोफत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून निर्जंतुकीकरणासाठी फवारणी देखील करण्यात आली आहे.
या कामासाठी सरपंच पुष्पलता गोडगे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय गोडके, मनोज घनवट, आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तलाठी भिजले, ग्रामसेवक भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, गावातील तरुण मंडळी यांचे परिश्रम लाभले आहे.