सोलापूर- महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गुन्हे रोखण्यासाठी सरकारचे व पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक राहिलेले नाही. यामुळे मागील काही महिन्यांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. पण, महाविकास आघाडी सरकार केवळ आपली सत्ता टिकविण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे सरकारला राज्यातील जनतेचे काहीच देणे-घेणे नाही, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केला आहे.
सोलापुरात एका खासगी कार्यक्रमासाठी दरेकर आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
महिला अत्याचारावर आळा घालण्यास सरकार अपयशी