सोलापूर - शहरातील शासकीय रूग्णालयातील कोरोना वार्डात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. शासकीय रूग्णालयात मागील अडीच महिन्यापासून अविरतपणे सेवा देणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रणिती शिंदे यांनी त्यांचा रूग्णालयात जाऊन सत्कार केला.
Coronavirus : शासकीय रूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचा प्रणिती शिंदेंनी केला सत्कार - Solapur Corona News
कोरोना वार्डात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर ते सफाई कामगार हे जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत. अशा परिस्थिती सफाई कामगारांनी कोरोना वार्डात केलेल्या कामाचे कौतुक शिंदे यांनी केले आहे.
सोलापुरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढच चालली आहे. राज्यात कोरोना नसलेला जिल्हा म्हणून काही दिवसांपर्यंत ओळख असलेला सोलापूर जिल्हा हा आता कोरोनाबाधितांच्या संख्येत आघाडी घेत आहे. 1100पेक्षा जास्त कोरोनाबाधितांची संख्या सोलापुरात झाली आहे. या कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेवरदेखील ताण येत असताना आरोग्य सेवा देणारे कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. यामध्ये सफाई कर्मचारी हे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
कोरोना वार्डात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर ते सफाई कामगार हे जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत. अशा परिस्थिती सफाई कामगारांनी कोरोना वार्डात केलेल्या कामाचे कौतुक शिंदे यांनी केले आहे. त्यांनी कोव्हिड योद्ध्याचा सत्कार व सन्मान हा रूग्णालयात जाऊन केला.