सोलापूर :राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आमदार प्रणिती शिंदे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात शिंदे गट - ठाकरे गट यांच्यामध्ये सत्ता संघर्षावरून वाद सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यावर आपला मित्रपक्ष म्हणून काय प्रतिक्रिया आहे, असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांना विचारला असता, सत्तेसाठी सर्वकाही सुरू आहे. सरकारच जनतेशी काही देणे नाही. हे लोकांना कळून चुकले आहे. आमचा त्यांच्याविरुद्ध लढा असाच सुरू राहणार. बीजेपी हा आमचा एकमेव शत्रू आहे, अशी प्रतिक्रिया आ. प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात शिंदेच गीत :पगारवाढीसाठी अंगणवाडी सेविकांचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. सोलापूर शहर, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यावेळी सहभागी झाल्या. तसेच त्यांनी राज्य सरकार, केंद्र सरकारवर टीका केली. रॅलीदरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी गाणे गात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंगणवाडी सेविकांसोबत चटणी भाकर खाल्ली.