महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात अतिवृष्टीमुळे पोल्ट्री फार्मचे नुकसान; हजारो कोंबड्या मृत्युमुखी

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पोल्ट्री फार्म चालकांचे मोठे नुकसान झाले. फार्ममध्ये पाणी शिरल्याने हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. मात्र प्रशासनाने अजूनही पंचनामे केलेले नाही.

हजारो कोंबड्या मृत्यूमुखी
हजारो कोंबड्या मृत्यूमुखी

By

Published : Oct 16, 2020, 4:34 PM IST

सोलापूर- जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पोल्ट्री फार्म चालक हवालदिल झाले आहेत. होटगी येथील पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

सोलापुरात अतिवृष्टीमुळे पोल्ट्री फार्मचे लाखोंचे नुकसान

दक्षिण सोलापूर तालुक्यात होटगी गाव आहे. गावातील काही शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पोल्ट्री उद्योग सुरू केला. कोरोना काळात पोल्ट्री फार्मचालकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता पुरामुळे नुकसान झाले. गावाजवळील पाझर तलावातून पाण्याचा मोठा लोंढा पोल्ट्रीफार्ममध्ये शिरला. काही फार्ममध्ये छोटी- छोटी पिल्ले होती. तर, काही पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या होत्या. पण पावसाचा जोर जास्त असल्याने २० ते २५ मिनिटांत या फार्ममध्ये कंबरेएवढे पाणी जमा झाले. त्यात सर्व पिल्ले व मोठ्या कोंबड्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

कोरोना महामारीमुळे या उद्योगाला मोठा फटका बसला होता. आधीच कंबरडे मोडलेल्या पोल्ट्री फार्मचालकांचे आता पुरामुळे नुकसान झाले. असे असले तरी, प्रशासनाने अजूनही नुकसानीची दखल घेतली नाही. शिवाय पंचनामे देखील केले नाहीत. सरकारने तात्काळ मदत देण्याची मागणी चालकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details