पंढरपूर (सोलापूर) - बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे तीन शेतकऱ्यांनी शेतामध्ये बेकायदेशीररित्या अफूची लागवड ( Poppy cultivation in Barshi taluka in Solapur) केली होती. अफू विकण्याच्या उद्देशाने केल्या या लावगडीवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी सुमारे पंधरा लाखाचा ऐवज जप्त करत तालुका पोलीस स्टेशनमध्ये तीन शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
साडे 14 लाखांचा अफू गेला जप्त -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील फपाळवाडी येथे बेकायदा अफूची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना समजली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अरुण फपाळ यांच्या गट नंबर 27, 28, 29 रामेश्वर फपाळ यांच्या गट नंबर 31, 32 तर राज्य भोपाळ यांच्या गट नंबर 46 मध्ये पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांनी सुमारे 727 किलो अफू जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 14 लाख 54 हजार एवढी आहे.