महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लग्नमंडपातच रंगला जुगार, पोलिसांचा छापा, 11 जणांना अटक - Solapur District Crime News

लग्नाच्या मंडपात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून, पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Police raid gambling den
लग्नमंडपात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा

By

Published : Nov 21, 2020, 6:05 PM IST

सोलापूर -जेलरोड पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने लग्नाच्या मंडपात छापा टाकल्याची घटना घडली आहे. हळदीच्या कार्यक्रमात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

किडवाई चौक परिसरात असलेल्या हतुरे मंगल कार्यालयात आयोजीत हळदीच्या कार्यक्रमामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 11 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 हजार 400 रुपयांची रोख रक्कम, 6 मोबाईल आणि 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

लग्नाच्या दिवशी नातेवाईकांची जामिनासाठी धावपळ

इसाक शेख, साहिल बागवान, दाऊद शेख, सलमान बागवान, रफिक शेख, सद्दाम कुरेशी, सकलेन मुजावर, यासिन बागवान, शरफोद्दीन कलादगी, महंमद कुरेशी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने, ऐन लग्नाच्या दिवशी त्यांच्या सुटकेसाठी नातेवाईकांची धावपळ उडाली.

ABOUT THE AUTHOR

...view details