सोलापूर- कुर्डुवाडी पोलिसांनी शहर सोडून जाण्यासाठी मारहाण केल्याची तक्रार तृतीयपंथीयांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी शहरात पंधरा ते वीस तृतीयपंथी गेल्या अनेक दिवसांपासून राहत आहेत. त्यांचा स्थानिक नागरिकांना कोणताच त्रास नाही. रेल्वेत मागतगिरी करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मकरसंक्रात साजरी करायला एकत्र आलेल्या तृतीयपंथियामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद झाल्यावर, तक्रार घेऊन पोलिसांत गेल्यावर उलट पोलिसांनी तृतीयपंथीयांना पोलीस ठाण्यातच मारहाण केली. त्याचे मूळ कारण पोलिसांना हे तृतीयपंथीय कुर्डुवाडीत नको आहेत. त्यामुळे तृतीयपंथीयांतील वादाचा फायदा घेऊन पोलिसांनी अमानवी मारहाण केली.