महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार स्वार्थी, ते स्वतःच्याच कुटुंबाचा विचार करतात; मोदींचा पलटवार - Sharad pawar

स्वतः शरद पवार हे स्वार्थी असून ते केवळ स्वतःच्याच कुटुंबाचा विचार करतात. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे मी पवारांना सांगतो, की माझेही कुटुंब आहे. थोर महापुरुषांनी ज्या समाजाला आपले कुटुंब मानले, तो संपूर्ण समाज माझे कुटुंब आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

शरद पवार स्वार्थी, ते स्वतःच्याच कुटुंबाचा विचार करतात; मोदींचा पलटवार

By

Published : Apr 17, 2019, 5:48 PM IST

सोलापूर - स्वतः शरद पवार हे स्वार्थी असून ते केवळ स्वतःच्याच कुटुंबाचा विचार करतात. त्यांनी माझ्या कुटुंबाबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे मी पवारांना सांगतो, की माझेही कुटुंब आहे. थोर महापुरुषांनी ज्या समाजाला आपले कुटुंब मानले, तो संपूर्ण समाज माझे कुटुंब आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

अकलुजच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी


माढा आणि बारामती लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी अकलूज येथे आले होते, त्यावेळी त्यांनी हा पलटवार केला.


मोदी म्हणाले, लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांना त्यांचा पराभव दिसला. त्यामुळेच शरद पवारांनी या मतदारसंघातून पळ काढला. अशी टीका मोदी यांनी केली. शरद पवार यांनी माझ्यावर टीका करत असताना माझ्या कुटुंबाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ते फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतात. असेही मोदी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा खास शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या सभेत शरद पवार हे टीकेच्या केंद्रस्थानी होते. या सभेत मोदींनी पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details