महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये, विनाकारण गर्दी टाळण्यासाठी निर्णय - सोलापूर रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 50 रूपये

सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार आहे. त्यातच गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. पण रेल्वे स्थानकावर प्रवाशांसोबत त्याचे नातेवाईकही येत आहेत. यामुळे स्थानकात गर्दी होत आहे. त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढवण्यात आला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट 10 रूपयांवरून 50 रुपये केले आहे. शिवाय ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असेल, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

solapur
सोलापूर

By

Published : Apr 29, 2021, 5:50 PM IST

सोलापूर :कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्लॅटफॉर्मवर अनेकवेळा प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांची गर्दी होते. ही गर्दी रोखण्यासाठी प्लॅटफॉर्मचे दर वाढवण्यात आले आहेत. सोलापूर मध्य रेल्वे विभागाच्या वतीने सोलापूर विभागातील मुख्य रेल्वे स्थानकांवर याची अंमलबजावणी होत आहे. सोलापूर, अहमदनगर, कलबुर्गी (गुलबर्गा) या स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकीट 10 रूपयांवरून 50 रुपये केले असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

सोलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये

24 मे पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ
सोलापूर मध्य रेल्वे विभागाने सोलापूर, अहमदनगर आणि कलबुर्गी (गुलबर्गा) या महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढ केली आहे. कारण या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसोबत येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांसोबत येणाऱ्यांना आता 24 मे 2021पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्यासाठी 50 रुपये मोजावे लागतील. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 27 एप्रिल 2021पासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

तिकीट कन्फर्म असेल तरच रेल्वे स्थानकात प्रवेश

सोलापूर हे उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. कोरोना महामारी काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे प्रवास थांबले. आता ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असेल, त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

10 प्रवाशी रेल्वे गाड्या 10 मे पर्यंत रद्द
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय विभाग वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. याचा परिणाम मध्य रेल्वे विभागावर देखील झाला आहे. सुमारे 10 प्रवाशी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द झाल्याने चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामध्ये मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी-मुंबई हमसफर एक्स्प्रेस, नागपूर-पुणे, दादर-शिर्डी साईनगर एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्या आहेत. 10 मे पर्यंत या गाड्या बंद राहतील. या गाड्या तोट्यात जात असल्याने बंद करत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे मुंबई टी-२० लीग पुढे ढकलली, मिलिंद नार्वेकर यांची ट्विटरद्वारे माहिती

हेही वाचा -नाशिक : गँगस्टर रवी पुजारीला 13 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details