महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई, १० मोटरसायकलसह १२ मोबाईल हस्तगत

आकाश बामण (वय २४, रा.जुनी पेठ पंढरपूर), सोहेल अफजल बागवान (वय २२, रा.जुना कराड नाका पंढरपूर जि.सोलापूर) हे मोटार सायकल चोरून विक्री करणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पकडण्यात त्यांना पोलिसांनी पकडले. या दोघांना विश्वासात घेऊन विचारपुस केल्यास त्यांनी अशा प्रकार चोरी केलेल्या मोटार सायकली पंढरपूर शहरात लपवून ठेवल्या असून काही मोटार सायकल विक्री केल्या असल्याचे सांगीतले. त्यांचेकडुन मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

pandharpur city police seized 12 mobiles along with 10 motorcycles
पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई

By

Published : Oct 25, 2020, 3:08 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन १० मोटार सायकली चोरुन आणलेल्या आहेत. त्यांची एकूण किंमत ३ लाख ७० हजार रुपये तर पंढरपूर शहरात गहाळ झालेले इतर १२ मोबाईल हस्तगत केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

ते म्हणाले, की आकाश बामण (वय २४, रा.जुनी पेठ पंढरपूर), सोहेल अफजल बागवान (वय २२, रा.जुना कराड नाका पंढरपूर जि.सोलापूर) हे मोटार सायकल चोरून विक्री करणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पकडण्यात त्यांना पोलिसांनी पकडले. या दोघांना विश्वासात घेऊन विचारपुस केल्यास त्यांनी अशा प्रकार चोरी केलेल्या मोटार सायकली पंढरपूर शहरात लपवून ठेवल्या असून काही मोटार सायकल विक्री केल्या असल्याचे सांगीतले. त्यांचेकडुन मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

मोबाईल चोरी प्रकरणी अहमद नजीर सय्यद (वय ३१, रा. बाळकृष्ण नगर, माढा रोड, कुर्डवाडी, ता.माढा जि. सोलापूर) शहीदा महादेव तुपे (वय ३६ , रा. पानवण, ता. माण, जि सातारा), भोजलींग महादेव तुपे (वय १९, रा पानवण, ता. माण, जि. सातारा) या तिघांना पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत केला आहे. त्याचबरोबर शहीदा महादेव तुपे हिची घरझडती घेतली असता इतर तीन मोबाईल हस्तगत केले आहे. त्याचप्रमाणे एकूण १२ मोबाईल हस्तगत करण्यात आले.

यावेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरूण पवार, सपोनि. नवनाथ गायकवाड, सपोनि शिवाजी करे, सपोनि राजेंद्र गाडेकर, पोहेकॉ सुजित उबाळे, बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, पोना प्रसाद औटी, गणेश पवार, अभिजीत कांबळे, शोयब पठाण, सतिश चंदनशिवे, मच्छींद्र राजगे, संदीप पाटील, इरफान शेख, सिध्दनाथ मोरे, संजय गूटाळ, समाधान माने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details