महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

....जावयासारखे लाजले मोदी; खासदार ओवेसींनी उडवली खिल्ली - Solpaur

मागील आठवड्यात एका टीव्ही वाहिनीवर मोदींची मुलाखत सुरु होती. त्यावेळी मुलाखतकार महिलेने तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते, असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी जणू एखादा नवविवाहित जावई सासुरवाडीला गेला आहे असे लाजून-मुरडून उत्तर देत होते, असे म्हणत ओवेसींनी मोदींची खिल्ली उडवली.

आंबेडकरांच्या प्रचारार्थ सोलापूरात आयोजित सभेत बोलताना खासदार ओवेसी

By

Published : Apr 11, 2019, 11:54 PM IST

Updated : Apr 12, 2019, 12:02 AM IST

सोलापूर- सध्या देशात माध्यमांकडून होणाऱ्या दुजाभावाचा समाचार घेताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ सोलापुरात ओवेसी यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी हा अनपेक्षित अभिनय केला. त्याला उपस्थितीत जनसमुदायाने हास्यप्रतिसाद दिला.

आंबेडकरांच्या प्रचारार्थ सोलापुरात आयोजित सभेत बोलताना खासदार ओवेसी

यावेळी ओवेसी म्हणाले, की मागील आठवड्यात एका टीव्ही वाहिनीवर मोदींची मुलाखत सुरु होती. त्यावेळी मुलाखतकार महिलेने तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते, असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी जणू एखादा नवविवाहित जावई सासुरवाडीला गेला आहे असे लाजून-मुरडून उत्तर देत होते, असे म्हणत ओवेसींनी मोदींची खिल्ली उडवली.

सध्या लोकसभा निवडणुकीत टीका टिप्पणी करण्यावरून नेत्यांची भाषा घसरत आहे. विशेष म्हणजे लोकमनोरंजनासाठी कुणाचीही खिल्ली उडवली जात आहे. तोच अनुभव सोलापुरातल्या सभेत आला.

Last Updated : Apr 12, 2019, 12:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details