सोलापूर -दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाजवळील पाटील वस्ती व हिरजे वस्ती येथील दोन कुटुंबीयाच्या घरी पाच दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ( Robbery in South Solapur ) बाबू कल्लप्पा हिरजे (वय 65 वर्ष) या वृद्धाचा दरोडेखोराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ( One died in Theives Attack ) या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सुहास जगताप आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी दुपारपर्यंत फिर्याद आणि जबाब आणि पंचनामा करण्याचे कार्य सुरू होते.
पाच ते सहा दरोडेखोरांचा जीवघेणा हल्ला -
बुधवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास पाच दरोडेखोर बोरामणी शिवारात आले. सुरुवातीला बाबू हिरजे यांच्या घरी दरोडा टाकला. बाबू हिरजे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते. दरोडेखोरांनी पत्नीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील व कानातील दिड तोळाचे सोने हिसकावून घेतले. दरोडेखोरांना प्रतिकार करणारे बाबू हिरजे यांच्या डोक्यात दरोडेखोरांनी कुऱ्हाडीसारख्या हत्याराने वार केला आणि विटाने प्रहार केला. रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या बाबू हिरडेंचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोर पाटील यांच्या घरांपर्यंत पोहोचले. पाटील हे जागे झाल्याने त्या ठिकाणी दरोडे टाकण्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांच्या झालेल्या झटापटीत पाटील यांच्या हाताला चाकू लागला. पाटील हे मोठमोठ्यांने आवाज केल्याने दरोडेखोर तिथून पळून गेले.
हेही वाचा -Gopichand Padalkar : वादग्रस्त विधानावर अखेर पडळकरांनी व्यक्त केली दिलगीरी